ताज्या घडामोडीप.महाराष्ट्रब्रेकिंग न्यूज

*महवितरणचा गलथान कारभार;नविन 25 वीज मिटर कचरा कुंडीत*

महावितरण कंपनीचा गलथांन कारभार

शेअर करा

 

देवळाली प्रवरा दि, २ मे/ टीम सीएम न्यूज

टाळेबंदीच्या काळात  अहमदनगर जिल्ह्यात महावितरण कंपनीमध्ये घरगुती वीज मीटरचा तुटवडा जाणवत आहे. नागरिकांची मागणी असताना त्यांना मीटर दिले जात नसताना मात्र राहुरी तालुक्यातील  देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात श्रीरामपूर रोड लगत असलेल्या गुलदगड (बुवा) यांचे चहाचे हॉटेल लगत असलेल्या पत्र्याच्या टपरी मागे कचरा टाकतात तसे महवितरण चे 25  नविन वीज मिटर टाकुन दिल्याचे आढळून  आले.  त्यामुळे महावितरण कंपनीचा गलथांन कारभार समोर आला आहे.

देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे श्रीरामपूर येथील मित्र देवळाली प्रवरा येथील  सोसायटी  चौकात या बुवा च्या हॉटेल जवळ बोलत उभे असताना ढुस यांचे या मिटर पडलेल्या जागेकडे लक्ष गेले.. जवळ जावुन पाहिले असता ते महा वितरण कंपनीचे नवीन वीज मिटर असल्याचे ढुस यांच्या लक्षात आले.त्यांनी यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे महावितरणचे मुख्य अभियंता सांगळे साहेब यांना फोन करून माहिती दिली.  सांगळे साहेब यांनी तात्काळ देवळाली प्रवरा चे उप अभियंता देहरकर साहेब यांना घट्नास्थळी पाठवुन सर्व मीटरची  ची तपासणी करून पंचनामा केला.

पंचनामा करताना 25 नग नविन मिटर आढळून आले. या सीरियल क्रमांकाचे नविन मिटर कार्यालयातून कोणी, केंव्हा ताब्यात घेतले होते, आणि या ठिकाणी कसे आढळून आले? याची सखोल चौकशी करून दोषींवर   कारवाई करण्यात येइल असे डेहरकर साहेब यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून वीज मीटरची ग्राहकांची मागणी प्रलंबित आहे. जिल्ह्यात मीटर नसल्याचे महावितरण विभागाकडून सांगितले जाते. मात्र असे रस्त्यावर सापडणारे मीटर येतात कोठून असा प्रश्न आहे?

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: