Thursday, September 4, 2025
HomeUncategorizedराज्यातील गड किल्ले पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात मध्ये

राज्यातील गड किल्ले पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात मध्ये

अहिल्यानगर दि.२७


mann ki baat kille पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात राज्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेल्या ऐतिहसिक नोंदीचा उल्लेख राज्यातील शिवप्रेमीचा आनंद द्विगुणीत करणारा असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथे जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां समवेत पाहीला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग महानगर अध्यक्ष अनिल मोहीते माजी महापौर बाबासाहेब वाकळे विनायक देशमुख धनंजय जाधव निखील वारे उपस्थित होते.

मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील गड किल्यांची जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्याच्या ऐतिहसिक घटनेचा संदर्भ देवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या गड किल्ल्यांचे महत्व अधिकच अधोरेखीत केले आहे.

आॅगस्ट महीन्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचा तसेच ९ आॅगस्ट क्रांतीदिनाचा तसेच स्वदेशी दिनाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचा केलेला उल्लेख राष्ट्र विचारांची प्रेरणा जागविणारा आणि सर्वाना प्रोत्साहीत करणारा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

विकसित भारताच्या वाटचाली मध्ये टेक्सटाइल उद्योगच्या माध्यमातून होत असलेल्या प्रगतीचा गौरव पूर्ण उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैठण येथील कविता ढवळे या उद्योजक महीलेचे दिलेले उदाहरण महीला बचत गट तसेच हॅण्डलूम क्षेत्रातील व्यवसाय करणार्या नव उद्योजकांच्या समोर आदर्शव्रत आहेत.

अमेरीकेत नुकत्याच संपन्न झालेल्या “वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम ” या स्पर्धेत संरक्षण व्यवस्थेत कार्यरत असलेल्या प्रतिनीधीनी सहाशे पदक मिळवून तिसर्या क्रमांकावर येण्याची ऐतिहसिक कामगिरी केली.या स्पर्धा २०२९ मध्ये भारतात आयोजित करण्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात केलेले सुतोवाच क्रिडा क्षेत्राला नवी संधी आणि पाठबळ देणारे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments