राहुरी :- प्रतिनिधी (देवराज मंतोडे)
mazi shala sundar shala savitribai phule madhyamik vidyalaya महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने पुणे विभागात द्वितीय क्रमांकाचे रु १५ लाख रुपयाचे बक्षिस पटकावले.
नुकताच राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षणमंत्री दिपक केसरकर , शिक्षण आयुक्त सुरज मांढरे , प्रधान सचिव आय. ए कुंदन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रशांतकुमार पाटील ,सचिव डॉ.महानंद माने ,प्राचार्य अरुण तुपविहीरे ,उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा प्रा.जितेंद्र मेटकर ,बाळासाहेब खेत्री यांनी पुणे विभागस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.
शालेय शिक्षण विभागाद्वारे संपूर्ण राज्यभर राबविले गेलेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह विद्यालयातील पायाभूत सुविधा ,शासन ध्येयधोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादणूक व गुणात्मक वाढ या प्रमुख घटकांवर आधारित विविध स्पर्धात्मक उपक्रम व निकष निश्चित करून राबविण्यात
आले .
या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातून सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ११ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते.
या अभियानात सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधांसोबतच गुणात्मक वाढीसाठी विविध उपक्रम विद्यालयात राबविले जातात . स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, एन एम एम एस परीक्षा , इन्सपायर अवार्ड निवड, एसएससी व एचएससी परिक्षांचे उत्कृष्ट निकाल तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील नैपुण्यपूर्ण यशाचा वाढता आलेख , पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट परसबाग व त्याचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध क्रीडा सुविधा व प्रशिक्षणे त्यामुळे अनेक विद्यार्थी जिल्हा ,विभाग ,राज्य पातळीवर यशस्वी होऊन राष्ट्रीय स्तरापर्यंत संपादन केलेले यश.
विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, एकाग्रता, स्मरणशक्ती यांत वाढ होण्याच्या दृष्टीने दररोज आनापान मित्र उपक्रम राबविला जातो. जीवनाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विवेक विचार जागृत होण्याच्या दृष्टीने अनेक वैज्ञानिक उपक्रम विद्यालयात राबवले जातात व विज्ञानाविषयी स्पर्धा परिक्षा तसेच उपक्रमांत देखील अनेक विद्यार्थी तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत यशस्वी ठरले आहेत. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख होऊन त्यांच्या अंगभूत कला कौशल्य व आवड याचा विकासासाठी शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत काही कौशल्याधिष्टित अभ्यासक्रमांची सुरुवात विद्यालयात करण्यात आली आहे. विद्यालयातील संगीतमय प्रार्थना, विज्ञान प्रयोगशाळे सोबतच ,सुसज्ज गणित प्रयोगशाळा, चित्रकला- हस्तकला यासाठी विविध उपक्रम असे अनेक यशस्वी विद्यार्थी उपक्रमामुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यालयाच्या या अभूतपूर्व यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांची प्रेरणा , सभापती डॉ .प्रमोद रसाळ यांचे मार्गदर्शन व सचिव डॉ.महानंद माने यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, खजिनदार महेश घाडगे यांचे आर्थिक नियोजन , प्राचार्य अरुण तुपविहिरे सर यांचे विज्ञाननिष्ठ व परिवर्तनावादी तंत्रस्नेही विचार , उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा व प्रा. जितेंद्र मेटकर ,हलीम शेख , एनसीसी अधिकारी संतोष जाधव ,क्रीडाशिक्षक घनश्याम सानप , तुकाराम जाधव ,सचिन सिन्नरकर ,श्री रवींद्र हरिचंद्रे, सुंदर करंडे अभिजित ठोंबरे,सिद्धांत मंतोडे ,सोमनाथ मलिनाथ व सर्वच अध्यापक वर्गाचे बहुमूल्य योगदान या सर्व यशामध्ये सिंहाचा वाटा आहे.
विद्यालयाच्या या उत्तुंग यशामुळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक , अध्यापक ,विद्यार्थी या सर्व घटकांचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.पालक वर्गाने ही या याप्रसंगी आनंदोत्सव साजरा केला.