Home Uncategorized Mla shivaji kardile dies माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे निधन

Mla shivaji kardile dies माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे निधन

0
7
mla shivaji kardile
mla shivaji kardile

अहिल्यानगर

Mla shivaji kardile राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले.‌मृत्युसमयी त्यांचे वय 66 इतके होते.पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुळचे बुऱ्हानगर येथील आमदार शिवाजी कर्डिले यांची व्यावसायिक कारकीर्द ही दुधाच्या व्यवसायाने झाली. ते नगर शहरात दुध घालण्यासाठी येत असत. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये निवडणूक लढविली त्यावेळी ते राष्ट्रवादी पक्षात होते. त्यानंतर २००९ मधेही ते राष्ट्रवादी मध्ये होते . २०१९ मध्ये त्यांचा राहुरी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. २०२४ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. त्यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून २००९ मध्ये लढविली होती.

आ.‌कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत‌ मोठा विजय मिळवला होता. बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.‌नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता. नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वरचष्मा होता.

त्यांच्यावर बुऱ्हानगर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली आणि मुलगा असा परिवार आहे. ते विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here