ताज्या घडामोडीमराठवाडा

*काय केले आमदार सुरेस धस यांनी?धसांची गांधीगिरी*

शेअर करा

*काय केले आमदार सुरेस धस यांनी?धसांची गांधीगिरी*

आष्टी दि २ प्रतिनिधी

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषद सदस्य सुरेश धस हे नेहमी वेगवेगळे फंडे वापरात असतात. शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या मंजुरीसाठी धस यांनी  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हरिनारायण आष्टा शाखेच्या व्यवस्थापकाचे पाय धुवून गांधीगिरी केली.

आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा अंतर्गत येणाऱ्या आष्टा गावासह इतर ११ गावातील शेतकर्यांचे पिक कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टा शाखेत केले जाते. शासनाने कर्ज प्रकरणे मंजूर करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे यापूर्वी आदेश दिले आहेत. मात्र या शाखेत आतापर्यंत फक्त 50 मोजून प्रकरणे मंजूर झाल्याने आमदार संतापले. त्यांनी या अधिकाऱ्याला आपल्या घरी बोलवून त्याला पाटावर बसवून त्याचे  मोठ्या ताटात पाय धुवून त्यावर फुलेही वाहिली.

हेही वाचा :कोरोना बिलासंदर्भात तुम्ही करू शकता कोविड रुग्णालयाच्या विरुद्ध तक्रार

हरिनारायण आष्टा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतक-यांच्या पिककर्जासाठीच्या सुमारे नऊ हजार शेतक-यांच्या फाईल दाखल आहेत पैकी केवळ 50 फाईल मंजूर केल्या आहेत.या मंदगतीच्या कामामुळे आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शाखा व्यवस्थापकाचे पाय धुवून विनंती करत गांधिगीरी केली.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close