ताज्या घडामोडीमराठवाडा

*दि_१७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेचा इशारा*

शेअर करा

 

बीड दि 18,प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने दि १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात तसेच
विशेषत्वाने मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. विशेषतः दि.१९ आणि २० ऑक्टोबर रोजी जास्त तीव्रतेने पाऊस येण्याचा इशारा प्राप्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शेतात काढणीस तयार असलेल्या पिकाची पावसाची उघडीप पाहून त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या पिकाची तात्काळ सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पावसाचे पाणी शेतात, उभ्या पिकात, भाजीपाला, फळबागेत साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावा. वाऱ्याच्या वेगात वाढ संभवण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना काठीचा आधार देण्यात यावा.पिकामध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढे ढकलावी .सदर कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पावसाची उघडीप पाहुन करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा:बीडचा कोरोनाचा आकडा कायम ;आष्टी फक्त 2

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: