ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने अभ्यासू नेता गमावला, विविध मान्यवरांची श्रद्धांजली

शेअर करा

पुणे दि.16 प्रतिनिधी

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज कोरोणामुळे निधन झाले..19 एप्रिल पासून सातव यांना कोरोनाची लक्षण दिसत होती 22 एप्रिल रोजी सातव यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह बआला होता.गेली 23 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाल. 4 वेळा ते संसद रत्न पुरस्काराने सन्मानित होते..गुजरातमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी बजावली होती..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!

आणखी वाचा:बीड आणि औरंगाबाद येथे मिळून 53 व्हेंटिलेटर पडून

राजीवजी सातव यांच्या जाण्याने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील युवकांचे मोठे नुकसान – गणेश बजगुडे पाटील

राजीवजी सातव यांच्या जाण्याने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक होतकरू तरुणांचे खुप मोठे नुकसान झालेले आसुन, मी एक चांगले मित्र तथा मार्गदर्शक गमावले आहे. त्यांच्या जाण्याने सातव कुटुंबावर कोसळलेल्या दुखामध्ये आम्ही सर्व सहभागी असून त्यांना शिवक्रांती संघटनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close