कृषीवार्ताताज्या घडामोडी

Mpkv- *मेघदूत मोबाईल अॅपद्वारे शेतकर्यांना मिळणार एका क्लिकवर हवामान आधारित कृषि सल्ला*

शेअर करा

 

राहुरी दि.26 फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

भारतीय हवामान विभाग, नवी दिल्ली आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सहकार्यातून शेतकर्यांकरीता मेघदूत हे मोबाईल अॅप विकसीत करण्यात आले आहे. या मेघदूत अॅपमध्ये हवामानाचा अंदाज, मागील हवामान व हवामान आधारीत पिकनिहाय कृषि सल्ला यांची माहिती शेतकर्यांना थेट त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होते.
मेघदूत अॅपमुळे शेतकर्यांना हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या पिकांचे नियोजन करणे शक्य होणार आहे तसेच पिकांचे होणारे सभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत होईल. शेतकर्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार आपल्या मातृभाषेत ही माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांचे हवामान व पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज आणि हवामान अंदाजानुसार कृषि सल्ला अपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होणार आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यांत, अगदी शेताच्या बांधावर ऊभे राहुन ही माहिती विनाशुल्क शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे.
तरी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात मेघदूत या मोबाईल अॅपचा वापर करण्याचे आवाहन ग्रामिण कृषि मौसम सेवा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्याद्वारे करण्यात आले आहे. त्याकरीता गुगल प्ले स्टोअरमधुन मेघदूत मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: