Home प्रादेशिक बातमी महात्मा फुले कृषि विद्यापीठ “युनिर्व्हसिटी ऑफ दि ईयर-फिक्की हायर एज्युकेशन एक्सलन्स-2024” पुरस्काराने...

महात्मा फुले कृषि विद्यापीठ “युनिर्व्हसिटी ऑफ दि ईयर-फिक्की हायर एज्युकेशन एक्सलन्स-2024” पुरस्काराने सन्मानीत

0
12
Mpkv honored with University of the Year-FICCI Higher Education Excellence-2024 Award
Mpkv honored with University of the Year-FICCI Higher Education Excellence-2024 Award


राहुरी- प्रतिनिधी( देवराज मंतोडे), दि. 18 ऑक्टोबर, 2024


Mpkv honored with University of the Year-FICCI Higher Education Excellence-2024 Award महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मानाचा समजला जाणारा नवी दिल्लीस्थित भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा (फिक्की) या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ-2024 या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारचे ब्रिटीश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन यांच्या शुभहस्ते देण्यात आला व हा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी स्वीकारला.

नवी दिल्ली येथे 10 वी उच्च शिक्षण शिखर परिषद-2024 संपन्न झाली. या परिषदेमध्ये भारत सरकारचे ब्रिटीश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन, भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव श्री. एस.के. बार्नवाल, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, देशातून आलेले औद्योगीक क्षेत्रातील तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.


महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात विस्तारलेले आहे. कृषि विद्यापीठ हे पदवीपासुन ते पदव्युत्तर पदवीपर्यंत तसेच आचार्य पदवीचे शिक्षण देते. आत्तापर्यंत कृषि विद्यापीठातून 1,56,333 विद्यार्थ्यांनी पदव्या प्राप्त केल्या आहे.

कृषि विद्यापीठाने आत्तापर्यंत अन्नधान्य, फळे, फुले, चारा पिके यांचे 306 हुन अधिक वाण विकसीत केले असून मृद व जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग व किडीचे नियंत्रण, अवजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रीया, दुग्धशास्त्र या विषयी सखोल संशोधन करुन 1866 हुन अधिक महत्वपूर्ण शिफारशी, 51 सुधारीत कृषि अवजारे आणि 4 पेटंट प्रसारीत केले आहेत. विस्तार शिक्षण कार्यातही विद्यापीठाचे महत्वपूर्ण योगदान आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तारामध्ये केलेले अभुतपूर्व कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here