ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टी :एमजी नरेगा ,मढ्यावरचे लोणी खाण्याचे प्रकार*

सतीश शिंदे यांचीही तक्रार

शेअर करा

 

आष्टी ,दि 7 मे टीम सीएमन्यूज

जिल्ह्यातील नरेगाच्या अनेक गैरव्यवहार प्रकरणात मढ्यावरचे लोणी खाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेले आहेत. असाच प्रकार आज पुन्हा एकदा आष्टी तालुक्यात चव्हाट्यावर आला आहे. यात विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटकाळातही नरेगा माफियांनी बोगसगिरी सुरुच ठेवली असून चक्क क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनाही नरेगाच्या कामावरील मजूर म्हणून दाखविण्यात आले. त्या व्यक्तींसह मयतांच्या नावावरही पैसे उचलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक आमदारांनीच केला आहे.

आष्टी तालुक्यातील मुशर्दपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य पती सतिष शिंदे यांनी नरेगा बोगसगिरी प्रकरणी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे दि.4 मे रोजी तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. परंतु या बोगसगिरीबाबत स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, आष्टी तालुक्यामध्ये 40 गावांमध्ये नरेगाच्या कामावर साडेनऊ हजार मजुर दाखविण्यात आले आहेत. मजूरांमध्ये मयत व्यक्ती, लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती, शासकीय कर्मचारी, होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांचा समावेश आहे. अशा व्यक्तींच्या परस्पर बँकेत खाते उघडून 20 ते 25 लाखांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याची तातडीने चौकशी करुन कारवाई केली आहे, असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close