ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*ट्रांसफार्मर वाहतुक व बदलण्याची जबाबदारी महावितरणची-ऊर्जामंत्री तनपुरे*

शेतकऱ्यांनी वाहतुक करायची नाही

शेअर करा

 

 

करंजी दि 2 नोव्हेंबर प्रतिनिधी

ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. त्याची वाहतुक शेतकऱ्यांनी करायची नाही तसे स्पष्ट आदेश उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

मिरी ता. पाथर्डी येथे जनता दरबारात ग्रामस्थांच्या शेकडो समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या त्यावेळी तनपुरे यांनी हे आदेश दिले.

यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले कि बिघाड झालेला ट्रान्सफार्मर किंवा जळायला ट्रान्सफार्मर महावितरण विभागानेच काढून घ्यायचा आहे त्याची वाहतूक करून तो दुरुस्त करून आणून त्याची सर्व जबाबदारी बसवून देण्यापर्यंत महावितरणनेच करायचे आहे शेतकरी याबाबत कोणतीही वाहतूक करणार नाहीत. याबाबत शेतकरी बांधवांनी बिनधास्त रहावे तसेच महावितरण तातडीने ट्रान्सफार्मर बदलावा. अन्यथा शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी असे आवाहन यावेळी तनपुरे यांनी केले

मिरी व शिंगवे येथे जनता दरबारामध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात या जनता दरबारात प्रतिसाद मिळाला.रस्ते वीज व पाणी या प्रमुख विषयासह इतरही ग्रामस्थांनी अनेक समस्या निवारण मांडल्या यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना समक्ष ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली त्यामुळे हा दरबार यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले त्यामुळे शासकीय निधी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली सध्या आमदार निधीही देण्यात अडचण येत आहे त्यामुळेच रस्त्यांच्या निधिचे बिडीओ कडूनच त्याचे नियोजन करण्यात येत आहे .महावितरण च्या बाबतीत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की की बहुतेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर बदलण्याची गरज आहे. मागील काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी विज क्षेत्राकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर हे खराब झाले आहे त्यामुळे खराब झालेल्या ठिकाणचे ट्रान्सफर बदलण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. गावठाण डीपी बाबत तातडीने निर्णय घेवुन तेथील ट्रान्सफार्मर बदलण्यात येतील.

वांबोरी चारीचे पाणी या भागाला कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी तनपुरे यांनी दिली. तनपुरे म्हणाले की सध्या मुळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच संबंधित विभागांशी संपर्क करून धरण ओव्हरफ्लो झाले बरोबर वांबोरी ला पाणी सोडणे सुरू केले त्यामुळे या भागातील सुमारे ३९ गावांमधील शंभर तलावांमध्ये वांबोरी तलावाचे पाणी सोडले आहे व या वांबोरी चारीने हे तलाव भरुन घेतले आहेत त्यामुळे या वर्षीही वांबोरी चारीने शंभर टक्के तलाव भरले आहेत. आता सोडलेले पाणी हे कोणत्याही हिशोबात धरलेले नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे ६८० एम सीएफटी पाणी धरणात तसेच शिल्लक आहे. वेळेनुसार भविष्यकाळात काही महिन्याने पुन्हा आपण हे आपले हक्काचे पाणी पुन्हा एकदा सोडून आपल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करणार असल्याचे तनपुरे यांनी यावेळी सांगितले.जनता दरबारामध्ये कोरणाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून हा जनता दरबार भरवण्यात आला . मास्क काढू नका, सुरक्षित अंतर ठेवा, iकोरोना बाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे कारण भविष्यात पुन्हा ही लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन तनपुरे यांनी केले. या कार्यक्रमावेळी पंचायत समीती सदस्य राहुल गवळी, सरपंच अमोल वाघ, जालींधर वामन, सुभाष गवळी, राजु तागड, राजुभाई दारूवाले,रंजीत भैया आदि सह गटविकास अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग , लघु पाटबंधारे विभाग व  महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:*विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर 1 डिसेंबरला मतदान

ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे तो काडायचा गाडीत घालुन न्यायचा तो बदलायचा व पुन्हा वाहतुक करून आणायचा हे फार अवघड काम शेतकऱ्यांना करावे लागत होते. पण आता उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हि जबाबदारी महावितरची आहे त्यांनीच हे काम करावे असे स्पष्ट आदेश दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे = राजु मरकड.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close