*माळवदाचे घर कोसळून एक जण जागीच ठार*
शेवगाव दि 19 सप्टेंबर, प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असेललेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे माळवदाचे घर पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली .
नानाभाऊ शंकर कोल्हे वय 79 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,आखेगाव येथील शेतकरी नानाभाऊ शंकर कोल्हे त्यांच्या राहत्या घरी सकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी शेळ्या बांधण्यासाठी गेले असता माळवदाचे घर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घर हे जुन्या लाकडी खणाचे आणि मातीतील असल्याने कोल्हे हे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावातील लोकांना कळताच लोकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न सफल न झाल्यामुळे जे.सी.बी.मशीन च्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी अनिल बडे, तलाठी गजानन शिकारे, पोलीस पाटील लक्ष्मण केदार,यांनी केला असून यावेळी सरपंच बाबासाहेब गोरडे उपस्थित होते,मयत नानाभाऊ कोल्हे यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.