ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Mumbai- *कुत्र्याच्या एसीसाठी त्याने भरला 7 लाखाचा दंड*

शेअर करा

 

नवी मुंबई दि 7 मार्च । टीम सीएमन्यूज

आपल्या कुत्रे पाळण्याची हौस आपल्याला किती अंगलट येऊ शकते,त्यात त्या कुत्र्यांना शाही बडदास्त ठेवावी लागत असेल तर.याबाबत नवल वाटायला नको,असा किस्सा नवी मुंबईतील नेरुळ च्या सेक्टर 1मधील ट्वीन्स लैंड हाउसिंग सोसायटी मध्ये घडला .

या सोसायटीमधील एका दाम्पत्याने आपल्या घरी कुत्रे पाळले.या कुत्र्यांची शाही बडदास्त ठेवण्यासाठी त्यांनी त्याला एसी बसविला , या एसीचे बिल वाचविण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीची वीज चोरली आणि कुत्र्यांना वातानुकूलित सुविधा दिली . महावितरण च्या अधिकाऱ्यांना ही खबर मिळताच त्यांनी छापा मारून वीज चोरी पकडली .या दाम्पत्याला 34446 यूनिट चोरी केल्याच्या संशयावरून 7 लाख 24 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महावितरण च्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close