आरोग्यमहाराष्ट्र

Mumbai- *राज्यात येत्या १ मे पासून ‘हे’ बंद*

शेअर करा

 

 

मुंबई दि.28 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

Advertisement

राज्यात येत्या १ मे पासून सिंगल युज डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरलं जाणारं प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.
प्लस्टिक बंदी असूनही काही भागात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण सर्रास सुरू असल्यासंदर्भात काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत , या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत ,असं त्यांनी सांगितलं .
प्लास्टिक बंदी एक लोकचळवळ व्हायला हवी लोकांच्या सहभागाशिवाय प्लास्टिक बंदी यशस्वी होणार नाही. यासाठी लोकांनी प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, असं मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लगेचंच बंदी आणता येणार नाही हा मुद्दा धार्मिक भावनेशी निगडीत आहे असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: