ब्रेकिंग न्यूज

Nagar-*माळी बाभुळगाव, ता.पाथर्डी येथे बनावट दारु कारखान्यावर छापा*

** स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

शेअर करा

 

पाथर्डी ,दि 15 टीम सीएमन्यूज

पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगावचे शिवारात समर्थनगर भागामध्ये प्रशांत हाटेलचे
पाठीमागे एका खाजगी घरात केमिकलचा वापर करून बनावट दारू तयार होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्धवस्त केला .

पाथर्डी तिसगाव रस्त्यावर माळीबाभूळगाव शिवारात विजय बाबुराव आब्हाड, रा. जांभळी, ता. पाथर्डी यांच्या मालकीचे घरामध्ये स्वत:चे फायदयाकरीता अनाधिकृतपणे वेगवेगळया प्रकारचे केमीकल वापरुन त्यापासुन मशीनचे सहायाने दारु तयार करुन ती बाटल्यामध्ये भरुन बाटल्यास वेगवेगळया नामांकीत कंपन्यांचे बनावट लेबल लावून मशीनचे सहाय्याने बाटल्या सिल करुन सदर दारुची
चोरुन विक्री करत असल्याच्या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा छापा टाकला .पोलीस या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांना एक व्यक्ती दारुच्या बाटल्या भरुन मशीनच्या सहाय्याने सिलबंद करीत असल्याचा आढळून आला .पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या बनावट दारूचा त्यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतर या बनावट दारूचा निर्माता सराईत असल्याचे पुढे आले .या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल आहेत . पोलिसांनी येथून (१) बॉटलींग ब टैन्गो नाव असलेले अंदाजे १०,००० बाटल्यांची काळी झाकणे (२) ऑफीसर चाईस नाव असलेले अंदाजे १००० बाटल्यांची सोनेरी रंगाचे झाकणे (३) इंपीरीयल ब्लु नाव असलेली निळया रंगाची अंदाजे २५० प्लॅस्टीकचे झाकणे (४) भिंगरी संत्रा नाव असलेले पांढर्या रंगाचे अंदाजे १००० झाकणे (५) सखु संत्रा टँगो प्रीमीयम या नावाची बाटल्यावर चिटकविण्यासाठी लागणारी अंदाजे ३००० कागदी लेबल (६) बॉबी संत्रा या नावाची बाटीवर चिटकविण्यासाठी लागणारी ३
कागदी लेबलचे नग (७) देशी गोल्ड नावाचे निळे पांढरे रंगाचे बाटलीवर चिटकविण्यासाठी लागणारे अंदाजे १००० लेबल (८) बॉक्स पॅकींग साठी लागणारे २० नग प्लॅस्टीकचे चिकट टेप (९) खाकी रंगाचे टंगो व भिंगरी देशी दारुचे लेबल असलेले कागदी बॉक्सचे बंडल १६ नग (१०) पांढरे रंगाचे प्लॅस्टीकचे नरसाळे, १ लीटरचे मापक, अल्कोहोल मिटर, लांब आकाराचे प्लॅस्टीकचे मापक (११) प्लॅस्टीकचे ३५ लीटरचे ४ ड्रम त्यामध्ये उप्र वास येत असलेले अंदाजे २०० लीटर केमीकल (१२) निळया रंगाचे लोखंडी धातुचे बाटल्या सील करण्याचे मशीन (१३) हिमालया, सरीता कंपनीच्या १००० लीटरच्या २, ५०० लीटरची १ व ३०० लीटरच्या २ अशा एकुण ५ ए्लॅस्टीकच्या टाक्या (१४) पाणी फिल्टर करण्याचे आर.ओ. फिल्टर मशीन (१५) वेगवेगळया रंगाचे २७ नग प्लॅस्टीक कॅरेट (१६) २५० लीटर क्षमतेच्या १३ व १०० लीटर
क्षमतेची १ अशा एकुण १४ प्लॅस्टीकच्या टाक्या (१७) ३ पाण्याचे पंप सेट (१८) वेगवेगळया कंपनीच्या काचेच्या १८० मी.ली.च्या अंदाजे १००० रिकाम्या बाटल्या (१९) बाटल्या सील करण्याचे ३ मशनीरी असा एकुण ५,९१,७०० / रु. किमतीचा बनावट दारु तयार करण्याचा मुद्देमाल जप्त केला आहे .
ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह ,
सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मंदार जावळे उपविभागीय
पोलीस अधीकारी, शेवगाव भाग, शेवगाव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पाथर्डी पो.स्टे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close