ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली;संगमनेर मधील 5 एकूण 49 संख्या*

शेअर करा

 

नगर दि 8 मे टीम सीएम न्यूज

इतके दिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या स्थिर असताना अचानक संगमनेर तालुक्यातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले .त्यामुळे बाधितांची संख्या 49 झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली .
आज संगमनेर येथील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोरोना बाधित यांची संख्या 49 झाली आहे. संगमनेर येथील 59 वर्षीय महिला तर धांदरफळ येथील दोन पुरुष आणि दोन महिलांचा बाधित व्यक्तींमध्ये समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. दरम्यान, इतर २३ अहवाल निगेटिव्ह आले असून आता अजून ५ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.

जिल्हा  सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३४ अहवालापैकी २८ अहवाल आज प्राप्त झाले. त्यात, २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०५ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.

दरम्यान काल मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून धांदरफळ येथील बाधित व्यक्ती या मृत व्यक्तीच्या नात्यातील आहेत. तर संगमनेर येथील महिलेला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिचा घशातील स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. धांदरफळ येथील बाधित यांमध्ये
29 वर्षीय आणि पंधरा वर्षीय युवक तर 25 आणि १९ वर्षीय युवती यांचा समावेश आहे.

दरम्यान, जे २३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यात धांदरफळ येथील ८, संगमनेर येथील ०४, पारनेर ०१, राहाता ०१, अकोले ०१, अहमदनगर ०२, जामखेड ०२, कोपरगाव ०१ आणि श्रीरामपूर येथील तिघांच्या अहवालाचा समावेश आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: