fbpx
ताज्या घडामोडीराजकीय

*नगर -जामखेड रस्ता ;बीड जिल्ह्यातल्या रस्त्याला केंव्हा निधी मिळणार?*

शेअर करा

 

 

आष्टी दि 29 प्रतिनिधी

Advertisement

 

अहमदनगर जामखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अहमदनगर जिल्ह्यातील हद्दीत निधी देण्यात आला आहे. त्या कामाचे भूमिपूजन नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी केले. मात्र हा रस्ता बीड जिल्ह्यातून जात असूनही बीड जिल्ह्यातील हद्दीत ह्या रस्त्याला निधी मंजूर नसल्याची माहिती पुढे आली असून बीड जिल्ह्याला केंव्हा निधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अहमदनगर- जामखेड हा पूर्ण ७३ किमी लांबीला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या अहमदनगर भागातील  दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने लवकरच सुरु होत आहे.या संपूर्ण रस्त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार छावणी मंडळाच्या विभाग सोडून पुढे या रस्त्याचे काम सुरु होत आहे. ७३ किमी पैकी २३ किमीच्या कामाचे भूमिपूजन अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी केले. मात्र उर्वरित आष्टी तालुक्यातील रस्त्याचे काय हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या संदर्भात बीडच्या खासदार याचा पाठपुरावा करतील काय ?

हेही वाचा :बीड जिल्ह्यात ७० कोरोना बाधित,वडवणी पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांचा समावेश 

अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतील या कामासाठी २९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मध्ये ७ मीटर ते १० मीटर रुंदीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे . यामध्ये जामखेड कडून काही किलोमीटर अंतराचे हे काम पूर्ण केले जाणार असून फक्त बीड जिल्ह्यातील काही भागाला हा निधी मिळाला नसल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील रस्त्याला निधी का मंजूर नाही? हा प्रश्न आहे. या रस्त्यासाठी नगरच्या खासदारांनी जोर लाऊन निधी मंजूर केला . पण बीड जिल्ह्यातील खासदार कमी पडले का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. दोन्ही बाजूनी रस्ता होणार मात्र आष्टी तालुका यापासून वंचित राहणार हे नक्की. यासाठी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी लक्ष घालायला हवे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close