ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Nagar-post *पोस्ट खाते आगळा वेगळा महिला दिन साजरा करणार*

शेअर करा

 

नगर दि. 26फेब्रुवारी/ टीम सीएम न्यूज

8 मार्च जागतिक महिला दिन पोस्ट खात्याने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. पोस्ट खात्यामार्फत महिलांच्या सबलीकरणासाठी तसेच आर्थिक समावेशन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार येणार असल्याची माहिती डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री. जे. टी. भोसले यांनी दिली .

पोस्ट खात्याकडून २२ फेब्रु. ते ७ मार्च हे दोन आठवडे “महिला दिवस अभियान” म्हणून राबविण्यात येणार आहेत या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन खाती उघडण्याचा निर्धार पोस्ट खात्याने केला आहे.

या योजनेअंतर्गत ० ते १० वयोगटातील मुलींचे खाते उघडले जाते. सुरवातीला कमीत कमी रु.२५०/- भरून नवीन खाते उघडले जाते. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाखापर्यंत रक्कम भरता येते आणि सदर रकमेवर पालकांना आयकरात सूट मिळते. यासाठी मूलीच्या जन्माचा दाखला, पालकाचे ओळखपत्र, पत्याचा पुरावा व फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर सुकन्या समृद्धी खात्याचा कालावधी २१ वर्षाचा असून १५ वर्ष रक्कम भरावी लागते. तसेच
मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, विवाहासाठी रक्कम काढण्याची तरतूद आहे. पोस्ट खात्यामार्फत बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना भेटी देऊन तसेच पालकांचे मेळावे घेऊन जास्तीत जास्त सुकन्या समृद्धि योजनेचे खाते उघडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरी ० ते १० वयोगटातील मुलींच्या पालकांनी अद्याप
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले नसेल तर सदर महिला दिवस अभियानामध्ये आपल्या
मुलीचे खाते उघडून घ्यावे. यासाठी कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आवश्यक
कागदपत्रांसाह भेटावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री. जे. टी. भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close