क्राईमब्रेकिंग न्यूज

*स्कुल व्हॅन मधुन दारु विक्री*

१,५४,६८० /- रुपयांचा मुददेमाल जप्त

शेअर करा

नगर दि,6 मे ,टीम सीएमन्यूज

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात देशी विदेशी दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ग्रामीण भागात दारू विक्रीसाठी शहरातून विविध मार्गाने ही दारू पोहचली जात आहे.त्यासाठी स्कुल व्हॅनचा वापर केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढे आले आहे .शहरातून विक्रीसाठी दारू घेउन जाणाऱ्या एका स्कुल व्हॅनला पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या टीम ने रंगेहात पकडले आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीतील
नगर ते कापुरवाडी रोडवर नागर देवळे फाटा येथे नागरदेवळे कमान जवळ संजय एकनाथ लोणारे रा. कापुरवाडी हा एका
पिवळया रंगाच्या मारुती स्कुल व्हॅन मधून विदेशी दारु विक्री करत असल्याची माहिती मिळताच  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील  यांनी दोन पंचासह पोलीस
अधिकारी व कर्मचारी यांचेसह छापा टाकला.यामध्ये पिवळया रंगाच्या मारुती स्कुल व्हॅन नंबर एम.एच. १२ ए.एफ. ४८८९ मधुन दारुची विक्री करतांना मिळुन आला.या मारुती व्हॅनची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात ४,६८० रु.किं.ची. ३६ मॅकडॉल रम कंपनीच्या १८० मिलीच्या सिलबंद बाटल्या मिळुन आल्या. आरोपी संजय एकनाथ लोणारे रा. कापुरवाडी याचे विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला  गु.र.नं. १३९६/२०२० महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर अखिलेश कुमार सिंह अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. संदिप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर ,सपोनि प्रविण पाटील , पो.उप.निरीक्षक पंकज शिंदे,पो.ना आर.ए.सुद्रीक , पो.कॉ. सचिन घोंडे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close