क्राईमताज्या घडामोडीमराठवाडा

*नराधम प्रियकराला देगलुर पोलिसांच्या मदतीने अटक;प्रेयसीला रस्त्यातच जिवंत जाळले*

शेअर करा

 

बीड दि 15 प्रतिनिधी

नराधम प्रियकराला देगलुर पोलिसांच्या मदतीने अटक केल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली.या प्रियकराने प्रेयसीला येळंब घाट येथे रस्त्यातच जिवंत जाळले होते.त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

या घटनेचा राज्यात तीव्र निषेध होत असून
पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येळंब घाट येथे प्रेयसीला रस्त्यातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न प्रियकराने केल्याची घटना दि 14 रोजी घडली.त्यानंतर दुपारी ही घटना उजेडात आल्यानंतर या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिचा तिथे मृत्यू झाला होता .

घटना घडल्यानंतर ही तरुणी तब्बल 12 तास मृत्यूच्या छायेत वेदना सहन करत होती.त्यानंतर तिचे आज निधन झाले .
प्रेयसीला सोडून प्रियकर फरार झाला होता.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा,डिगंबर अंकुरवार वय 22 असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती आपल्याच गावातील तरुण अविनाश राजुरे यांच्यासोबत दुचाकीवरून गावी जात होती. रात्री उशिरा येळंब घाट जवळ आल्यानंतर ह्या नराधम याने सावित्रा ला रस्त्यापासून काही दूर असलेल्या दगडाच्या खदानी कडे नेऊन गाडीवरून खाली उतरून तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला .यावरच तो न थांबता त्याने तिच्यावर ऍसिडही टाकले .या मध्ये ही तरुणी 48 टक्के भाजली होती .आज जिल्हा रुग्णालयात तिचे निधन झाले.

हेही वाचा:महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याची चित्रा वाघ यांची टीका

अशा अवस्थेत कोणाचेही लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ही तरुणी पडली होती.पहाटे दोन वाजलेपासून ते दुपारी 2 पर्यंत ही तरुणी तिथेच पडून होती .रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिला नेकनूरच्या दवाखान्यात आणि तेथून बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले होते.
नेकनूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी देंगलूर येथील पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेतले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close