Top-न्यूजताज्या घडामोडी

 होता पुतण्या म्हणून वाचली काकू ! बिबट्याच्या तावडीतून काकूची सुटका करण्यात पुतण्याला यश

शेअर करा

 

 

आष्टी दि 29 प्रतिनिधी

गवत काढण्यासाठी शेतात गेलेल्या काकू वर बिबट्याने हल्ला केला. काकूने आरडओरड केल्यानंतर जवळच असलेल्या पुतण्याने आवाज ऐकल्यानंतर काकू कडे धाव घेतली. काकूला ओढत घेऊन जाणाऱ्या बिबट्याला हाकलले फरफटत नेताना काकूची सुटका केली. ही घटना आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील बोराडे वस्तीवर घडली.

शालनबाई शहादेव भोसले (वय ६०, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) ह्या आपल्या शेतात गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. गवत घेत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला.त्यावेळी त्या महिलेचा पुतण्या विजय भोसले हा जवळच होता. ओरडण्याचा आवाज आल्याने चुलतीचा जीव वाचवण्यासाठी धावत येऊन  बिबट्याच्या तावडीतून चुलतीला सोडवले मात्र चुलतीला सोडवल्यानंतर बिबट्याने विजयलाही जखमी केले. विजयच्या ही हातावर व छातीवर जखमा झाल्या आहेत.या हल्ल्यात शालनबाई यांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी प्रथम उपचार करून जखमा जास्त खोलवर असल्याने शालनबाई यांना अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.विजय बोराडे यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

सुरुडी, किन्ही या दुसर्‍या टोकाला असलेल्या गावानंतर त्याच्या विरुद्ध टोकाच्या आष्टी शहर व पारगाव जोगेशरी या गावातही बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने दहशत वाढत चालली आहे.

 

हेही वाचा :चप्पल विसरली आणि बिबट्याने घेतला बळी; आष्टी तालुक्यातील पारगावची घटना 

 दोन्ही आमदारांच्या पारगाव जोगेश्वरी ला भेट
पारगाव जोगेश्वरी येथे बिबट्याने महिला व तिच्या पुतण्याला
गंभीर घटना केल्यानंतर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे
व विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी तातडीने
घटनास्थळी भेटी देत वन अधिकाऱ्यांना कडक शब्दात
सुचना दिल्या त्याचबरोबर नागरिकांनी ही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close