Tuesday, October 14, 2025
HomeUncategorizedफर्निचरच्या गोडावूनला भीषण आग लागुन पाच जणांचा गुदमरून मृत्यू,

फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग लागुन पाच जणांचा गुदमरून मृत्यू,

नेवासा

Newasa 5 died becoz of suffocation नेवासा ते नेवासाफाटा रस्त्यावर असलेल्या कॉलेज परिसरात असलेल्या रासने यांच्या कालिका फर्निचरच्या मागील बाजूस असलेल्या गोडावूनला मध्यरात्री पावनेदोनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली.

या घटनेने नेवासा शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.सदरची आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे
   
सदर घटनेची खबर मयत मयूरचे चुलत बंधू राजेंद्र रासने यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली.याबाबत माहिती अशी की नेवासा ते नेवासाफाटा या रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर कॉलेज परिसरात रासने बंधू यांचे कालिका फर्निचर नावाने दुकान आहे.

या दुकानाच्या वरील मजल्यावरच दुकानाचे मुख्य मालक अरुण चंद्रकांत रासने हे आपला मुलगा मयूर रासने,सून सौ.पायल रासने, नातू
अंश मयूर रासने,चैतन्य मयूर रासने,आई सिंधूताई चंद्रकांत रासने,पुतणे यश रासने असे रहात होते.
  
मध्यरात्री १.४५ च्या सुमारास अरुण रासने हे रहात असलेल्या फर्निचरच्या वरच्या मजल्यावरील घराच्या मागेच फर्निचरचे गोडावून आहे,या गोडावूनला अचानक लागलेल्या आगीत सर्व फर्निचर साहित्य जळून खाक झाले.

या आगीच्या धुराचा लोळ घराच्या मागील दरवाजा व खिडकीतून रासने कुटुंब रहात असलेल्या घरात आला.घरातील सर्व गाढ झोपेत असतांना यातील
मयूर रासने,सिंधुताई रासने,सौ.पायल रासने,अंश रासने,चैतन्य रासने यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

तर अरुण रासने यांचे पुतणे यश रासने यांना काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने ते बाहेर आले तसेच दुकानचे मुख्य मालक अरुण रासने व त्यांची पत्नी सौ.रासने हे बाहेरगावी गेल्याने सुदैवाने हे सर्व बचावले.
  
या घटनेच्या प्रसंगी परिसरातील युवक व नागरिकांनी एकत्रित येत गोडवूनची आग विझविण्यासाठी प्रयत्न केला,कालिका फर्निचर दुकानाच्या शेजारील बाजूस गोडावूनकडे जाण्याचा रस्ता होता.तसेच दुकानाच्या व राहत्या घराच्या मागील बाजूस खिडक्याद्वारे आलेल्या आग व धुराच्या लोळाने झोपेत असलेल्या रासने परिवारातील कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
   

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments