क्राईम

*हत्या करून नऊ तुकडे ;कोणताच पुरावा नसताना पोलिसांनी शोधला आरोपी*

राजूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

शेअर करा

 

अहमदनगर दि 4 जुलै टीम सीएमन्यूज

आरोपी कितीही हुशार असला तरी पोलीस त्याला शोधून काढतात असे म्हटलं जातं.असेच कोणतेही पुरावा नसताना पोलीस थेट आरोपी पर्यंत पोहचू शकले आणि त्यांनी आरोपीला अटक केली.अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णावंती नदीमध्ये मिळून आलेल्या अनोळख्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले.

अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोंडी शिवारातील कृष्णावती नदीवर असलेल्या पुलाखाली एका अनोळखी इसमाचे शरिराचे नऊ तुकडे करुन ते वेगवेगळ्या दोन पोत्यामध्ये भरुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फेकून देण्यात आले होते. यासंदर्भात चिचोंडी गावचे पोलीस पाटील अंकुश रामचंद्र मदे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
त्या वरून मृत व्यक्तीचे फोटो सोशल मिडिया वरून व्हायरल करण्यात आले त्यावरून
खिरविरे, ता.अकोले येथील हा तरुण प्रदीप सूरेश भांगरे असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येबाबत पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी साधे वेषामध्ये गुन्हा घडले परिसरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरुन गोपनिय माहीती घेतली असता मयत व त्याचे आजोबा नामे कमलाकर हणूमत डगळे यांच्यात नेहमी वाद होत होते.अधिक चौकशी करून आणि पोलिसी खाक्या दाखवताच
त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मुलगा हरिचंद्र याची मदत घेवून सदर प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सागितले त्यावरुन आरोपी नामे २) हरिचंद्र कमलाकर डगळे, वय- ३५ वर्षे, रा. खिरविरे, ता- अकोले, ह. रा. यवत ता- दाँड जि- पुणे यांस यवत येथून स्थानिक गुन्हे शाखा व पोनि/ श्री. उत्तम तांगडे, क्राईम युनिट, पिंपरी चिंचवड, पुणे यांचे संयुक्त टीमने ताब्यात घेतले.
आरोपीकडे गुन्हाची कसून चौकशी केली असता आरोपी कमलाकर हणमंत डगळे याने सांगीतले कि, मयत प्रदीप सुरेश भांगरे, वय-२५ वर्षे हा नातू असून तो नेहमी दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत असे, त्यावरुन आमचे वाद झाले होते. नातू प्रदीप सुरेश भांगरे हा त्याचे मोटार सायकल घेयून दारु पिण्यासाठी पैसे मागणे करीता आला होता. त्यावरून वाद झाल्याने कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली असल्याचे सांगीतले व त्यानंतर प्रेताचे नऊ वेगवेगळे तुकडे करुन ते दोन गोण्यामध्ये भरुन जवळच असलेल्या शेत तळ्यामध्ये टाकले व मयत याची मोटार सायकल बाभूळवंडी शिवारातील रस्त्याचे कडेला झूडूपामध्ये नेवून टाकली. त्यानंतर आरोपी के. २ मुलगा हरिचंद्र कमलाकर डगळे यांस यवत येथून बोलावून येवून दोघांनी शेत ताळ्यातील प्रेताच्या गोण्या बाहेर काढून मोटार सायकलवरुन नेवून चिोंडी शिवारातील कृष्णावती नदीवर असलेल्या पुलाखाली फेकून दिल्या असल्याचे सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close