ताज्या घडामोडी

*शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी लागू करावी-मराठवाडा शिक्षक संघ*

शेअर करा

 

 

बीड दि २२ ऑक्टोबर,प्रतिनिधी

 

 

राज्यातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना २४ वर्षानंतर द्यावयाची कालबद्ध पदोन्नती निवडश्रेणी मंजूर करून अन्याय दूर करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघटनेने शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

राज्यातील शिक्षकांना १२ वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षानंतर निवडश्रेणी दिली जाते. मात्र राज्यातील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतरची निवडश्रेणी अद्याप लागू केलेली नाही . यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती द्यावी असे आदेश दिले आहेत. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी न्यायालयात जाण्याची गरज नसल्याचे निर्देश  न्यायालयाने दिले आहेत.

 

हेही वाचा : *बीड जिल्ह्याचा कोरोना आला १००च्या आत;निगेटिव्ह अहवाल वाढताहेत!*

 

 

 

असे असूनही राज्य शासन याची दाखल घेत नसून, तात्काळ दखल घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शिक्षण मंत्री,अप्पर मुख्य सचिव आणि  शिक्षण संचालक यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी एस घाडगे, संघाचे सरचिटणीस व्ही जी पवार यांच्या सह्या आहेत.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close