ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*केडगावसह जिल्ह्यात 10 कोरोना बाधित नगर जिल्ह्याची संख्या@141*

आतापर्यंत 70 घरी परतले

शेअर करा

 

अहमदनगर दि 31 मे टीम सीएमन्यूज

कोरोनाचा कहर अहमदनगर जिल्ह्यात थांबायला तयार नाही .उलट संख्या वाढताना दिसत आहे आज दिवसभरात 10 नवीन कोरोना बाधितांची भर पडली असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 141 झाली आहे.आज जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 02 असून आतापर्यंत ७० बाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

आज दिवसभरात ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .
बाधित रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे ०२ बाधित झाले असून ते बाधीत रुग्णाचे नातेवाईक आहेत .
राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष बाधित आढळुन आला असून तो बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.
संगमनेर तालुक्यात ०५ बाधित आढळून आले असून यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे आढळून आली असून त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक बाधित झाले असून ते बाधिताच्या संपर्कातील आहेत .पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे .तर केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली २८ वर्षीय महिला बाधित झाली आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close