ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भ

*मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा-विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर*

शेअर करा

 

बीड दि 5 ऑक्टोबर, प्रतिनिधी

Advertisement

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,
बीड जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण करावेत अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज बीडच्या जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी त्यांनी माजलगावच्या गंगामसला, घळाटवाडी, वडवणी या ठिकाणच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागील पंधरा दिवसात झालेल्या पावसाने माजलगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे पिकांचे त्याचबरोबर अनेक गावांना गोदावरी नदीच्या आलेल्या पुराचा फटका बसला होता. आणि याच गावांची पाहणी दरेकर यांनी केली.

यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.त्यानंतर दरेकर यांनी बीड पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दौऱ्यासंदर्भात संवाद साधला .यावेळी आमदार विनायक मेटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित होते.

 

ईमेलला राज्यपालांचे उत्तर;40 मिनिटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

यावेळी त्यांनी आपल्या बागायती शेतीसाठी पन्नास हजार रुपये आणि कोरडवाहू शेतीसाठी पंचवीस हजार रुपये तात्काळ मदत द्यावी या मागणीचा पुनरुच्चार करत संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करावेत अश्या मागण्या केल्या आहेत.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: