fbpx
ताज्या घडामोडीशैक्षणिक

*शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात शिक्षण विभागाने काढला पर्याय*

शेअर करा

 

अहमदनगर दि 20 ,प्रतिनिधी

Advertisement

शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात अहमदनगर जिल्हा शिक्षण विभागाने पर्याय काढला असून सर्व शिक्षकांच्या चाचणी ऐवजी शाळेतील ठराविक शिक्षकांच्या चाचण्या होणार असल्याचे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हाराळ यांनी सांगितले.
9 ते 12 वीच्या शाळा सुरू होण्यास अवघ्या 3 दिवसांचा कालावधी उरला आहे .त्यात शासनाने सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना RTPCR चाचण्या बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्यातील 16 हजार 706 शिक्षकांची टेस्ट करावी लागणार आहे .
मात्र कमी कालावधीत ही चाचणी होणार नसल्याने आज सकाळी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, क्लार्क,गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या सुरुवातीला टेस्ट करून शाळा उघडण्यात येणार आहेत.
त्यानंतर हळूहळू इतर शिक्षकांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.जिल्हा कोविड प्रयोगशाळेची क्षमता पाहता सर्वच शिक्षकांच्या चाचण्या कमी वेळेत शक्य नाही .ज्या शिक्षक इतर जिल्ह्यातून येणार असतील त्यांनी त्या त्या जिल्ह्यात चाचण्या करून रिपोर्ट सादर केला तरी ग्राह्य धरला जाणार असल्याचे हाराळ यांनी सांगितले.

हेही वाचा:शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार!शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close