ताज्या घडामोडीराजकीय

*पंकजा मुंडे सह 50 जणांवर दसरा मेळावा प्रकरणी गुन्हा दाखल*

शेअर करा

 

पाटोदा दि 26 प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे यंदा घेण्यात आलेल्या सावरगाव  येथील दसरा मेळाव्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या सह 50 जणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवूनजिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे व इतर 50 जणांवर रविवारी रात्री पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या दसरा मेळावा मागील दाेन वर्षांपासून घेतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळाव ऑनलाइन झाला. पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातून समर्थकांना संबोधित केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत असे असताना सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक जमले हाेते.

हेही वाचा :अभिनेत्री पायल घोष बनली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची महिला आघाडी उपाध्यक्षा*

यामुळे, अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पंकजा मुंडे, खा. भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनीका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटाेदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर ५० जणांच्या विरुद्ध  गुन्हा नोंद केला.जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांनी या प्रकरणी तक्रार दिली.त्यांच्यावर कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close