क्राईमताज्या घडामोडी

*थोबाडीत मारीन म्हणणाऱ्या सुदाम मुंडेंच्या प्रशासनाने मुसक्या आवळल्या*

शेअर करा

बीड दि 6 सप्टेंबर, प्रतिनिधी

पाच सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आरोग्य विभागासह महसूल आणि पोलिसांची टीम साडेनऊ वाजता सुदाम मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये पोहचली.या पथकाला पाहून मुंडे याने या पथकाला उत्तरे न देता धमकी देत पाहून घेईल,थोबाडीत देईल असे उत्तरे देत अरेरावी केली .आधीच शिक्षा भोगत असल्येल्या सुदाम मुंडे याच्या मुसक्या आवळल्या.

परळी शहरात स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी सुदाम मुंडे याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.सध्या हा जामीनावर आहे .मुंडे यांची वैद्यकीय परवाना  कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेल्या आहे.तरीही मुंडेने आपला दवाखाना सुरूच ठेवला होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पथक नेमून त्याची पाहणी केली.सायंकाळी या पथकाला या ठिकाणी औषधांचा साठा आढळून आला.परवानगी नसताना अलोपॅथीचा उपचार करत असल्याचे या पथकाला आढळून आले.

डॉ. सुदाम मुंडे यांना यापुर्वीचे गुन्हयात शिक्षा झालेली असल्याने त्यांची वैद्यकीय  पदवी / पदवीका निलंबीत केले असतांनाही तसेच त्याच्या हाँस्पीटलची नोंदणी ही बॉम्बे नर्सिंग होम अँड अंतर्गत नसतांनाही वैद्यकीय  व्यवसाय करुन पेशंट कड़ुन फिस घेवुन फसवणुक केली व वैद्यकीय ज्ञान कायदेशीर वापरण्याची परवानगी नसतांनाही अलोपॅथी वैद्यकीय व्यवसाय करुन जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण केला संबधीत आरोपी यांचे दवाखान्यात गर्भपातासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साधने आणी उपकरणे व मानवी आरोग्यास धोका होईल अशा स्थीतीत जैव वैद्यकीय कचरा आढुळुन आला. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करून अटक करण्यात आली.

या मोहीमेमध्ये रामनगर परळी या गावातील बोगस डॉक्टरांची तपासणी करण्याची जबाबदारी तपासणी पथक प्रमुख म्हणून डॉ. मैडे बालासाहेब शिवाजीराव , वैद्यकीय
अधीकारी, प्रा.आ.क्रेंद्र धर्मापुरी यांची होती. सदर पथकामध्ये  गणेश महाडीक, उपविभागीय अधीकारी परळी ,विपीन पाटील, तहसीलदार परळी, डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकीत्सक बीड . डॉ मुंडे ज्ञानोबा उत्तमराव, वैद्यकीय अधीकारी,प्रा.आ. क्रेंद्र धर्मापुरी,डॉ मोरे लक्ष्मण लिंबाजी, ता. आरोग्य अधीकारी परळी ०६. डॉ कुरमे दिनेश आप्पाराव, वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्नालय परळी ,रुपनर बाबुराव लक्ष्मण, नायब तहसीलदार परळी, हेमंत कदम, पोलीस निरिक्षंक पोस्टे परळी शहर . पवार बी. एन, पोलीस निरिक्षक पोस्टे संभाजीनगर हे सर्व अधिकारी सहभागी झाले होते.
यासंदर्भात  डॉ. मैडे बालासाहेब शिवाजीराव , वैधकीय अधीकारी प्रा. आ.क्रेंद्र धर्मापुरी यांचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन परळी
शहर येथे गुरनं १६९/२०२० कलम Indian Medical council act १९५६ चे कलम १५(२) आणी Maharastra medical
practioners act १९६१ कलम ३३ (२) आणी भादंवी कलम ३५३,१८८,२६९, २७०, २७८,४१९,४२०,१७५,१७९,५०४ सह आपती
व्यवस्थापण कायदा २००५ कलम ५१(B), साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ कलम २,३,४ सह वैघकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम
३,४,५ सह मुंबई सुश्रुषा नोंदणी कायदा १९४९ कलम ३(२ ) प्रमाणे आरोपी नामे सुदाम एकनाथ मुंडे वय ७० वर्ष रा. रामनगर परळी  यांचे विरुध्द गुन्हा दाखल आहे. आरोपी मुंडे यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा.जिल्हाधीकारी श्री. राहुल रेखावार साहेब, मा. पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोदार साहेब, मा.अ.पो. अ.श्रीमती स्वाती भोर,मैंडम, यांचे मार्गदर्शनाखाली कामगिरी केली आहे, सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. हेमंत पी. कदम, हे करीत आहेत.

हेही वाचा:बीड जिल्ह्यात ११० कोरोना बाधित;एसआरटी च्या ५ बाधितांचा समावेश

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close