आरोग्यताज्या घडामोडी

*पाथर्डी:14 कोरोना बाधित;शिरूरमधील बावीच्या एकाचा समावेश*

शेअर करा

 

पाथर्डी दि 17,प्रतिनिधी

आज दिवसभरात 14 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे तर दिलासादायक म्हणजे 31 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.यामध्ये आष्टी तालुक्यातील बावी येथील एकाचा समावेश आहे.

 

*अहमदनगर जिल्ह्यात३६३ नवे रुग्ण वाढले; ५३९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*

पाथर्डी न्यायालयातील एका कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. शहर आणि तालुक्यातील 12 व्यक्ती पाथर्डीच्या कोविड सेंटरच्या तपासणीत कोरोनाने बाधित झालेले आढळून आले आहे.
अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीत 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.एकूण 14 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर यांच्या पथकाने 54 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाथर्डी शहर 02,कासारगल्ली 02,वामनभाऊनगर 01, इंदिरानगर 02, नाथनगर 03, खरवंडी कासार 01, टेंभुर्णी (बीड) 01,बावी (आष्टी ) 01, सुसरे 01 या भागातील रुग्ण आढळून आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close