fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भ

*पाटोदा शून्यावर;बीड कोरोना बाधितांची संख्या घटली;*

शेअर करा

*कोरोना CORONA बाधितांची संख्या घटली;पाटोदा शून्यावर

Advertisement

 

बीड दि २ नोव्हेंबर,प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यात शून्य रुग्णाची नोंद झाली.कोरोना CORONA बाधितांची संख्या बीड जिल्ह्यात सातत्त्याने कमी होताना दिसत आहे. आजच्या संख्येने नीचांकी  आकडा गाठला आहे भविष्यात हा आकडा आणखी  कमी होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. आज आलेल्या अहवालात ५७  कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये गेवराई पोलीस ठाण्यातील तीन सहवासितांचा समावेश आहे.

 

बीड जिल्ह्यातील ७८२ रुग्णांचा कोरोना CORONA अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये ५७  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ७२५  रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी तालूक्यातील जामगाव आणि हाजीपुर या दोन गावातील दोन कोरोना बाधितांचा समावेश  आले.

पाटोदा तालुक्यात आज शून्य कोरोना बाधित आढळून आले. ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

अंबाजोगाई  ०२    , आष्टी ०२   बीड २३   ,धारूर ०८  गेवराई ०७   केज ०१   ,माजलगाव ०६  परळी ०४  पाटोदा ००   शिरूर कासार ०१   वडवणी ०३   असे एकूण ५७ रुग्ण कोरोना CORONA बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड  तालुक्याचा २३ इतका आहे.ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

 

जिल्ह्यातील निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढले असून ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. भविष्यात ही संख्या आणखी घटण्याचे चिन्ह दिसत असून कोरोना बीड जिल्ह्यातून गायब होणार असल्याचे दिसत आहे.

 

हेही वाचा:whatsapp युनिव्हर्सिटी च्या अफवांमुळे बिबट्या कमी अफवांचे पेव जास्त 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close