*सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा समाजाच्या खर्चातून करणार-आ.गोपीचंद पडळकर*
शेअर करा

 

चोंडी दि 31 मे टीम सीएमन्यूज

सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे . यासाठीचा लागणारा खर्च समाज सहभागातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 295 व्या जयंती निमित्त गोपीचंद पडळकर हे चौंडी येथे आले होते.

अहिल्यादेवी होळकरांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाल्यावर जयंतीच्या निमित्ताने पडळकर यांनी पुतळा उभारण्याची मागणी करत संकल्प सोडला आहे .सोलापूर विद्यापीठाचा नवीन 482 एकर च्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करत त्यासाठी लागणारा सर्व खर्च समाजाकडून करणार असल्याचे देखील पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
गोपीचंद पडळकर हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा चौंडी येथे आले होते. यावेळी पडळकर यंनी माजी मंत्री राम शिंदे यांची भेट घेतली. राम शिंदे यांनी देखील पडळकर यांचा फेटा बांधून सत्कार केला.

Share this story