*प्रशासक नियुक्ती मध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नसावा;ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली अण्णांची भेट*
*प्रशासक नियुक्ती मध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नसावा;ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली अण्णांची भेट*

 

अहमदनगर दि 24 जुलै टीमसीएम न्युज

ग्रामविकास मंत्र्यांवर जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती वरून नाराज होते.आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली.
ग्रामपंचायतीवर प्रशासक कोण असावा यासाठी सरपंच परिषदेनंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्णयाला जोरदार विरोध केला होता.त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अण्णांना पत्र पाठवून खुलासा केला होता.अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना आढावा घेण्यासाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली .तसेच प्रशासक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी दोघांमधे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा झाली. प्रशासक हा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यातून नेमावा, त्यात पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नसावा असा आग्रह हजारे यांनी धरला. त्याला ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मंत्र्यांना हजारे यांनी ग्रामविकासा संबंधीची पुस्तके भेट दिली. ग्रामविकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचे मंत्र्यांनी हजारे यांना सांगीतले.

Share this story