करुणा मुंडे लढविणार धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक
करुणा मुंडे

नगर ,

करुणा धनंजय मुंडे यांनी आपण परळी येथून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. करुणा धनंजय मुंडे यांनी नगर येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.
यावेळी त्यांनी सांगितले की ,जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतोय. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा, अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र आपण स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल असे करुणा धनंजय मुंडे यांनी अशी घोषणा नगर मध्ये  केली.

हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे, या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल, गरज पडली तर मी स्वतः परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असें त्यांनी यावेळी सांगितले.

आज समाजकारण करताना मला पॉवर मध्ये असणे गरजेचे वाटले त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करत आहे 

Share this story