*पंतप्रधान यांनी देशाची व शहिद जवानांच्या परिवाराची माफी मागावी:शरद आहेर*
*पंतप्रधान यांनी देशाची व शहिद जवानांच्या परिवाराची माफी मागावी:शरद आहेर*

 

नाशिक दि 26 जून टीम सीएमन्यूज

नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने भारत-चीन सीमेवर असलेल्या गलवान खोरे, व पॅगोंग सरोवर परिसरात चीन च्या सैन्याने बेकायदा घुसखोरी केली त्याच्या विरोधात, तसेच ती घुसखोरी मोडून काढण्याच्या निश्चयाने शाहिद झालेल्या २० भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
सर्वप्रथम शाहिद जवानांना मेणबत्ती पेटवून व पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच काल गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असतांना वीरमरण आलेले नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र कै. सचिन विक्रम मोरे, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
केंद्र सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणा विरोधात एक तासाचे मौन-व्रत पाळण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री शरद आहेर यांनी दिशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारताच्या सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केली नाही” या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले. देशाच्या पंतप्रधानाणे असे विधान करणे बरोबर व योग्य नाही. या विधानाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनने पुरेपूर गैरवापर करून भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. म्हणून पंतप्रधान यांनी देशाची व शाहिद जवान यांच्या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी शरद आहेर यांनी केली.
डॉ हेमलता पाटील यांनी सांगितले की देशाच्या पंतप्रधानांनी संयमाने बोलले पाहिजे. आंतरराष्ट्रीय विषय हाताळणीत नरेंद्र मोदी व भाजपा शाशीत केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.
डॉ शोभाताई बच्छाव यांनी सांगितले की, देशाच्या प्रामुख्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की पंतप्रधानाचे विधान हे देशाचे विधान असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानाच्या विधानाला विशेष महत्व असते, असे असतांना नरेंद्र मोदी यांचे हे विधान धक्कादायक आहे.
मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांनी देशाच्या जवानांना निशस्त्र चर्चेला पाठवले म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केली.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी कोरोना काळात चीनने भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा विरोध केला.
अनुसूचित सेलचे सचिव सुरेश मारू यांनी नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला.
दर्शन पाटील यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला.

या वेळी उद्धव पवार, अण्णा मोरे, कैलास कडलाग, ज्ञानेश्वर चव्हाण, इसाक कुरेशी, जावेद शेख, अनिल बोहोत, शोभा भोये, आकाश घोलप, दिनेश उनवने, प्रमोद धोंडगे, सलमान काजी, आकाश नागर, अंकुश मगर, जावेद इब्राहिम, अब्दुल बाबा, कल्पेश केदार, सुरज कांबळे, अविनाश गांगुर्डे निलेश (बबलू) खैरे अध्यक्ष मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटी आदी उपस्थित होते

Share this story