ताज्या घडामोडीफॅशन

देशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय

शेअर करा

देशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय

श्रीरामपूर दि 4 जानेवारी,प्रतिनिधी

देशातील नामांकित “दि ग्रेट पिजंट कॅमुनीटी”या संस्थेने आयोजित केलेल्या India’ Miss Tgpc या सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरच्या मराठमोळ्या कु. रश्मी राजीव शिंदे हिने देशात उपविजेतेपद मिळवुन श्रीरामपूर आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

केवळ सौंदर्यच नव्हे तर बुद्धिमत्तेचा कस लावणाऱ्या या ऑनलाईन स्पर्धेत देशातून चार हजारावर युवतींनी भाग घेतला होता. मुंबई, पुणे आदी शहरी भागांच्या तुलनेत श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातून मोठे यश मिळविणारी रश्मी ही राज्यातील पहिलीच युवती आहे.

उपविजेती रश्मी हीने VJTI अभियांत्रिकी कॉलेज मुंबई येथुन टेक्सटाईल इंजिनिअरची पदवी संपादन केली आहे. ती राष्ट्रस्तरीय स्केटिंग व राज्यस्तरीय बास्केटबॉल यासह एक उत्कृष्ट ऍथलेट आहे. स्केटिंगवर रॅम्प वॉक करणारी ती देशातील प्रथम सौंदर्यवती युवती आहे.तीने मिस टॅलेंट सह अनेक नामांकने मिळविली आहेत.प्रेरणा फौंडेशन या सामाजिक संस्थेची ती मानद सचिव आहे.तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ स्व. अँड.रावसाहेब शिंदे यांची रश्मी ही नात व डॉ. राजीव आणि डॉ. प्रेरणा शिंदे यांची सुकन्या आहे.

या सुयशाबद्दल तिचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले असून मिस इंडिया, मिस वर्ल्ड सारख्या मोठया स्पर्धेत सुयश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा:डीवायएसपीच्या लग्नाचाच चोरटयांनी गाठला मुहुर्त !

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close