ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*दिवसभरात नगर जिल्ह्यात  रेकॉर्डब्रेक कोरोना बाधित १३ ची भर एकूण संख्या@११७*एकाचा मृत्यू*

शेअर करा

 

अहमदनगर दि 29 मे टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील कोरोना बाधित   व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात १३ नवीन  व्यक्तींचे अहवाल पोंझीतीव्ह आल्यानंतर टाळेबंदीच्या काळातील बाधितांचा हा आकडा रेकोर्ड ब्रेक म्हणावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे. संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे. संगमनेरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

 

 

अहमदनगरच्या रुग्णालयातील कोविड लॅब मध्ये तपासण्यात आलेल्या अहवालापैकी १३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
यातील बाधित हे वेगवेगळ्या ठिकाणाहून नगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत .घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला १, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील  हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर येथील  २, आणि राहाता तालुक्यातील निमगाव  येथे ४ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.या बाधीत रुग्णामध्ये ०४ पुरुष,०४ महिला आणि ०१ वर्षीय लहान मुलगी यांचा समावेश आहे .
राहाता तालुक्यातील निमगाव येथील एक  व्यक्ती  बाधीत  सापडली होती त्या व्यक्तीच्या  संपर्कातील बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे .संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने संगमनेरच्या  ग्रामीण रुग्णालयाने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठविले होते . दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने त्यांना  जिल्हा रुग्णालयात  पाठविले होते . त्याचा  अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचा मृत्यू झाला.घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे .तर चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत आढळून आला आहे .
आढळुन आलेल्या विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु असून लवकरच या भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली जाणार आहे .

अधिक वाचा:रेड झोन मधील नागरिकांनी नगर जिल्हावासीयांची वाढविली धडधड जिल्ह्यात नवीन 9 बाधितांची भर एकूण संख्या@११२

जिल्ह्यासाठी सुखद म्हणजे आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनामुक्त, झाले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दोघे संगमनेर तर दोघे नगर शहरातील आहेत. आतापर्यंत एकूण ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात राशीन (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत असल्याचे आढळून आले आहे. हा व्यक्ती  पुण्यास नोकरीला असणाऱ्या पत्नीस भेटून आला होता गावी परत आला होता.
घाटकोपरहून टाकळीमिया (राहुरी) येथे आलेल्या १७ वर्षीय मुलीला झालेली लागण ही यापूर्वी बाधित असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने झाल्याचे दिसून येत आहे. शिर्डी जवळील
निमगाव तालुका राहाता  येथील बाधीत महिलेच्या  २० वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सायन (मुंबई) येथून केलुगण (ता. अकोले) येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून हा व्यक्ती ,मुबई येथील सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून ०८ मृत्यू हे  अहमदनगर  जिल्ह्यात तर तीन मृत्यू हे मुंबई येथील आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close