ताज्या घडामोडीराजकीय

कोणत्या खटल्यातून आमदार सुरेश धस यांची निर्दोष मुक्तता:सविस्तर वाचा

शेअर करा

 

आष्टी दि 30 डिसेंबर/प्रतिनिधी

कोरोना काळात जिल्हा बंदीचे उल्लंघन केल्याच्या खटल्यात विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांची आष्टी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
ऊसतोड मजूरांच्या मदतीसाठी जिल्हाबंदी असतानाही दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे आ.सुरेश धस यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाची अंतिम सुनावणी 30 डिसेंबर रोजी झाली.यामध्ये आ.सुरेश धस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

नगर जिल्ह्यातील  खेड तालुका कर्जत येथे जिल्ह्याच्या सीमा बंद असताना जाऊन शासनाच्या संचार बंदीचे आणि आपत्ती निवारण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:ऑलिम्पिक साठी आष्टीच्या निलेश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

आमदार सुरेश धस हे दि २ एप्रिल रोजी रात्री आष्टीहून अहमदनगर जिल्ह्यातील खेड तालुका कर्जत येथे गेले होते. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना जिल्हा प्रशासनाच्या व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 भादंवी सहकलम 51 (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आ सुरेश  यांना आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथील उसतोडणी मजूर खेड येथे अडकून पडले असून त्यांना पोलिसांनी मारहाण केली असल्याची माहिती मिळाल्या नंतर ते रात्री खेड येथे पोहचले आणि दुसर्या दिवशी ही ते तिकडे गेले आणि शासनाच्या विरोधात टीका केली. त्यांनी  नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आ.सुरेश धस यांच्या वतीने अॕड.बाबुराव अनारसे त्यांचे सहकारी संग्राम गळगटे यांनी बाजू मांडली.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close