ताज्या घडामोडीमराठवाडा

रेमडीसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिका-यांना नारळ फोडून साकडे; चौकशीची मागणी

शेअर करा

बीड दि 17 मे प्रतिनिधी

बीड जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण विलंब, अनियमितता, गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा प्रशासनातील आधिकारीच संगनमताने अनियमितता व काळ्या बाजारास चालना देत असून कुंपनंच शेत खात असल्याचा प्रकार आढळून येत आहे या प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी केली.त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाल, फुले वाहून श्रीफळ फोडून जिल्हाधिकारी यांना साकडे घातले.
त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन वितरण प्रणालीत वाटपास विलंब, तसेच मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार होत असून जिल्हाप्रशासनातील आधिकारीच उपजिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील जिल्हाशल्यचिकित्सक, सहाय्यक जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड, औषधी निरीक्षक आदिंचा यात हात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच संवेदनशील नागरीकांनी लेखी तक्रारी केल्या असून ठराविक हाॅस्पिटल व ठराविक तालुक्यांनाच नियमबाह्यपणे वाटप केले जाते, त्यामुळेच जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुर्यकांत गिते यांच्या मालकीच्या दिप हाॅस्पिटलला आणि लाईफ लाईन हाॅस्पिटललाच मोठ्या प्रमाणावर रेमडीसिवीर इंजेक्शन दिले जात आहेत, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्य़ातील पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी तालुक्याला जास्त प्रमाणावर रेमडीसिवीर इंजेक्शन खैरात वाटल्याप्रमाणे वाटली जात आहेत. तर माजलगाव, धारूर, वडवणी, आदिंना इंजेक्शन दिल्याची नोंद आढळुन येत नाही तर केज, अंबाजोगाई, गेवराई यांना कमी इंजेक्शन दिल्याची नोंद आहे.

आणखी वाचा:काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने अभ्यासू नेता गमावला, विविध मान्यवरांची श्रद्धांजली

खाजगी हाॅस्पिटलला रेमडीसिवीर इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची पडताळणी करून ऑडीट करा

बीड जिल्ह्य़ातील खाजगी रूग्णालयातील ज्या रूग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन दिले जाते त्याचे ऑडीट करण्यात यावे. कागदोपत्रीच बोगस रूग्ण दाखवून रेमडीसिवीर इंजेक्शन घेऊन काळ्या बाजारात 25-70 हजार रूपयापर्यंत विक्री केल्याच्या घटना घडल्या आहेत. आरोग्य विभागातील व जिल्हाप्रशासनातील आधिकारीच सामिल असल्या कारणाने उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणीही त्यांनी केली.

ना. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की परळीचे?

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे संपुर्ण बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आहेत की फक्त परळीचे असा प्रश्न डॉ ढवळे यांनी केला आहे.दि.13 मे रोजी बीड जिल्ह्य़ातील एकुण आलेल्या 72 रेमडीसिवीर इंजेक्शन पैकी 60 इंजेक्शन एकट्या परळी येथील जैन डिस्ट्रीब्यूटर्स यांना वाटप करण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close