ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

31 डिसेंबर पर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत निर्बंध; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

शेअर करा

31 डिसेंबर पर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत निर्बंध; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

अहमदनगर दि 3 डिसेंबर,प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पुन्हा एकदा रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई केली आहे.

आज या संदर्भातला आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी covid-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा
1897 अन्वये त्यांनी ही नियमावली जारी केले आहे.

मिशन बिगीन सुरू झाल्यानंतर संदर्भात मार्गदर्शक सुचना नुसार महाराष्ट्र शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार जिल्ह्यामध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी व्यक्तींच्या हालचालीवर फिरण्यावर रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे.यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्तींना बाहेर फिरता येणार नाही.

विवाह विवाह समारंभ इतर वैयक्तिक समारंभ आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पन्नास व व्यक्तिंना एकत्र येण्यास निर्बंध असणार नाही.म्हणजेच 50 पेक्ष्या जास्त व्यक्तीना विवाह समारंभासाठी एकत्र येता येणार नाही.

अंत्यसंस्कार,अंत्यविधी यासाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

Covid-19 च्या नियमांचे पालन करण्यासाठी ठिकाणी कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे.तसेच सामाजिक अंतर ठेवणे सार्वजनिक ठिकाणी सर्व व्यक्तींनी कमीत कमी सहा फूट इतके अंतर राखले पाहिजे. दुकानदार ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर राखण्याची सुनिश्चित करतील आणि एकाच वेळी पाच पेक्षा व्यक्तींना मुभा देण्यात येणार नाही. एकत्र जमणे, मोठे सार्वजनिक संमेलनं, सभा यास मनाई असणार आहे. विवाह संबंधी च्या कार्यक्रमात एकत्र जमणे पाहुण्यांची कमाल मर्यादा ही 50 पेक्षा अधिक असणार नाही .अंत्यसंस्कार अंत्यविधी यासंबंधीच्या कार्यक्रमात एकत्र जमणार या व्यक्तींची जास्तीत जास्त संख्या ही 20 असणार आहे. वीस पेक्षा अधिक असणार नाही.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर बंधन घालण्यात आले असून अशा व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:सोलवाडीत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला;गावकऱ्यांचा शेताला वेढा

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close