क्राईमताज्या घडामोडी

*बोधेगावात पाचपुते वस्तीवर दरोडा;१ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास*

शेअर करा

 

बोधेगाव दि,१६ प्रतिनिधी

येथील एकबुरजी येथे माजी सैनिक पाचपुते वस्तीवर बुधवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह एकूण सुमारे १ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

या घटनेमुळे बोधेगाव भागात घबराट निर्माण होऊन दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे.

याबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती बोधेगाव पासून 3 किमी अंतरावरील एकबुरजी वस्तीवर काही अंतरावर माजी सैनिक परशुराम पाचपुते यांचे आईवडील,भाऊ कुटुंब वस्तीवर राहत असून बुधवारी पहाटे साडेतीन-पावणे चारच्या सुमारास राहत्या घराची खिडकी तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश करून घरातील तीन पेट्या समानसह दरोडेखोरांनी लंपास केल्या.

घरात झोपलेल्या रुख्मिनीबाईना आवाजानं जाग आली त्यांनी आरडाओरड करताच लगतच्या शेड मध्ये झोपलेला मुलगा नानासाहेब पाचपुते जागा झाला असताना त्यास दरोडेखोरांनी लगतच्या तुरीच्या शेतात पेट्यासह पोबारा करत असल्याचे दिसले. नानासाहेब  भागूजी पाचपुते यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने त्यांचा एकट्याचा प्रयत्न तोकडा पडला.

दरोडेखोरांनी फिर्यादीचे वडील भागूजी पाचपुते हे झोपलेल्या खोलीचा दरोडेखोरांनी बाहेरून दरवाजा लावण्यात आला होता तो उघडून सदर झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर माजी सैनिक परशुराम पाचपुते, बाळासाहेब काशीद, अशोक घोरतळे आदी ग्रामस्थ घटनास्थळी आल्यानंतर परिसरात दरोडेखोरांचा तपास केला.

मात्र  तोपर्यंत दरोडेखोरांनी पोबारा केला मात्र लंपास केलेल्या पेट्या दादासाहेब काशीद, राजेंद्र गायकवाड, आबासाहेब देसले यांच्या शेतात उपकापाचक केलेल्या तीन पेट्या आढळून आल्या.मात्र त्यातील ठेवलेले रोख रक्कम,महिलांच्या गळ्यातील असलेल्या कर्ण फुल, नथ आदी सोनेचांदीच्या मौल्यवान वस्तू गायब केल्या.

तोपर्यंत दरोडेखोरांनी पलायन केले घटनेची माहिती पोलिसांना देतात बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे अभय लबडे, आण्णा पवार यांनी भेट देऊन वरिष्ठांना घटनेची माहिती दिली शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक पावरा, गोरे, ताफ्यासह भेट दिली दुपारी अहमदनगरहून श्वानपथक , ठसे तज्ञ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक दाखल होऊन दरोडेखोरांचा तपास घेत आहे सदर घटनेचा तातडीने तपास लावण्यात यावा व रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी ग्रामस्थांतुन मागणी होत आहे.

 हेही वाचा:*उसतोडणी मजूर आंदोलन तीव्र;आमदार सुरेश धस यांना अटक आणि सुटका*

श्वानने एक किलोमीटर माग काढला ……
श्वान पथकाने सदर घटने पासून शेताजमिनीतून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई मार्गावरील कांचन हॉटेल पर्यंत मार्ग दाखवला मात्र श्वान त्या ठिकाणी काहीवेळ घुटमळले गेले असल्याने दरोडेखोरांनी वाहनातून पलायन केले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.घरातील ६ वीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांनी खाऊचे जमा केलेले पैसे दरोडेखोरांनी लंपास केले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close