*राज्यशासनाच्या विरोधात आज आष्टीत धरणे आंदोलन*

 

आष्टी दि.25/टीम सी एम न्यू्ज[list icon=”undefined” ]list item per line.[/list][box][/box]
भारतीय जनता पार्टीच्यावतीने दि.२५ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आष्टी तहसिलसमोर उपोषण होत आहे.या उपोषणात अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट प्रती हेक्‍टरी २५ हजार रूपयांची व फळबागांना प्रती हेक्‍टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन कर्जमुक्ती करावी, महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा बसविण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायद्यात सुधारणा करून महिला व तरूणींवरील अत्याचार थांबवावेत.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारी फडणवीस यांच्या भाजपा – सेना महायुती शासनाने मंजुर केलेली वॉटरग्रीड योजना बंद न करता या योजनेस तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा.आष्टी तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या २०१९ मधील प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ८३० जलसिंचन विहीरींचे कार्यारंभ आदेश देऊन ही कामे तात्काळ सुरू करावेत आदि प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,माजी आमदार भीमराव धोंडे,भाजप नेते रमेशभाऊ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आष्टी, पाटोदा,शिरूर या तालुक्यातील बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख ,गटप्रमुख, गणप्रमुख ,जि.प.सदस्य पंचायत समिती सदस्य,सभापती,उपसभापती, तीन्ही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले आहे.

Share this story