*विनामास्क फिरणारांकडून पाच हजाराचा दंड वसूल कडा ग्रामपंचायतची कारवाई*
*विनामास्क फिरणारांकडून पाच हजाराचा दंड वसूल कडा ग्रामपंचायतची कारवाई*

 

कडा दि, 29 एप्रिल,टीम सीएमन्यूज

– लॉकडाऊन शिथिल असण्याच्या काळात विनामास्क फिरणाराकडून सुमारे पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे यांनी दिली.
कोरोना लॉकडाऊन काळात घराबाहेर पडू नका , पडल्यास तोंडाला मास्क असावा असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जाते . मात्र अनेकजण याचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात . अशा लोकांकडून आष्टी नगर पंचायतने तीस हजाराचा दंड वसूल केला आहे . कडा ग्रामपंचायतने देखील वारंवार आवाहन करून ही लोक ऐकत नसल्याने बुधवार पासून दंड वसुलीस सुरवात केली . यावेळी सकाळी ७ ते साडेनऊ या वेळेत विनामास्क फिरणाराकडून चार हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी खिलारे यांनी दिली . यापुढेही अशी कारवाई चालूच राहणार असून मास्क न लावता फिरणारा बरोबर रस्त्यांवर थुंकणार्याकडून ही दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this story