*आष्टीसह बीड जिल्ह्यातील 5 शहरातील रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 210 कोरोना बाधित*
*आष्टीसह बीड जिल्ह्यातील 5 शहरातील रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 210 कोरोना बाधित*

 

बीड दि. 18,प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी या ५ शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अँटीजन तपासणी आजपासून सुरुवात करण्यात आली.त्यामध्ये 210 नागरिक कोरोना बाधित आढळून आले.

बीड जिल्ह्यातील 5 शहरातील 5756 नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये अंबाजोगाई येथे 1697 टेस्ट 37 बाधित, आष्टी 629 टेस्ट 17 बाधित, केज 684 टेस्ट 19 बाधित,माजलगाव 1421 टेस्ट 71बाधित आणि परळी 1321 टेस्ट 66 बाधित असे एकूण 210 कोरोना बाधित आढळून आले आहेत.

दिनांक 19 आणि 20 ऑगस्ट रोजीही याच पद्धतीने रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येणार आहेत.
या मोहिमेत ५ शहरांतील सर्व प्रकारच्या व्यावसायिक- दुकानदारांची जसे किराणा, कपडे, सराफा, किराणा रिटेल होलसेल, आडत ,सिड्स अँड फर्टिलायझर्स ,परमिट व दारु दुकाने ,मेडिकल, जनरल स्टोअर्स, नाभिक ,फोटो स्टुडिओ, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यासह सर्व प्रकारच्या विविध व्यवसायिकांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:*आष्टीत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 17 कोरोना बाधित*

Share this story