*तब्बल ५३३ रुग्णांना मिळाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज;नगर जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण*
*तब्बल ५३३ रुग्णांना मिळाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज;नगर जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण*

 

अहमदनगर दि 8 प्रतिनिधी
जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.१४ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर ०१ – पिंपळगाव रोठा ०१, मनपा ०९ – शहर ०३, सावेडी ०२, नालेगाव ०१, गौरी घुमट ०१, बागरोजाहडको ०१, सिद्धार्थ नगर ०१, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा ०१.

*बरे झालेले एकूण रुग्ण:५८६६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६४३*

*मृत्यू: १००*

*एकूण रूग्ण संख्या: ८६०९*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

Share this story