*जिल्ह्यात आणखी दोन बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@४९**शहराची वाटचाल कंटेन्मेंट झोन कडे*
*जिल्ह्यात आणखी दोन बाधितांची भर; बाधित रुग्णांची संख्या@४९**शहराची वाटचाल कंटेन्मेंट झोन कडे*

 

बीड दि 26 मे टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात लॉक डाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .आज आणखी दोन बाधितांची भर पडून संख्या 49 इतकी झाली आहे .अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .हे दोन्ही रुग्ण धानोरा रोड भागातील आहेत .त्यामुळे शहर पुन्हा कॅटेन्मेंट झोन होणार आहे .
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि बीड येथून दररोज नवीन कोरोना लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे स्वब टेस्टिंग साठी पाठविले जात आहेत.त्यात पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढत आहे .
बीड जिल्हयातील आज एकूण ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.मात्र हे अहवाल अजून मिळाले नाहीत .काल दिनांक 25 रोजी पाठविलेल्या स्वब पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून 5 अहवाल प्रतीक्षेत आहेत .

Share this story