Beed-crime- *वाळू चोरांवर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
बीड दि 26 फेब्रुवारी ।टीम सीएमन्यूज
  सिंदफना नदी पात्रात वाळूची चोरी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्त घालताना मिळताच या पथकाने
तरटेवाडी, ता. जि. बीड परिसरात धाड टाकून तीन ट्रॅक्टर वाळूसह जप्त केले .
  तीन ट्रक्टरमध्ये विनापरवाना वाळू भरत असल्याचे आढळून आल्याने  त्यांच्याकडे वाळू भरण्याच्या आणि वाहतुकीचा अधिकृत  परवाना न आढळल्याने त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई करून ट्रॅक्टर सह वाहने जप्त करण्यात आली .
चोरटी वाहतुक करताना  जनार्दन विनायक काळे, वय 42 वर्षे त्यांचा जॉन डियर 5310 कंपनीचा ट्रक्टर क्रमांक MH 23 B 9376 व ट्रॉली क्रमांक MH 23 Q 5297 मध्ये अंदाजे
एक ब्रास वाळू , आनंद सुदाम पवळ, वय 23 वर्षे याच्या ताव्यात स्वराज 744 कंपनीचा ट्रक्टर व नंबर नसलेल्या ट्रॉलोमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू,विजय रमेश रडे वय 22 वर्षे यांचा  जॉन डियर 5050 कंपनीचा ट्रॅक्टर
क्रमांक MH 23 AJ 0717 व नंबर नसलेली रिकामी ट्रॉली नदी पात्रात मिळुन आली. या सर्व
ट्रॅक्टर चालक हे शासनाचा कुठलाही कर न भरता सिंदफना नदी पात्रातुन चोरटी विक्री करण्यासाठी बाळू भरून घेवून जात असल्याचे आढळून आले  .या तीनही  ट्रक्टर व ट्राली  चालकांसह पुढील करवाई करण्यासाठी गेवराई पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
*आणखी एका हायवा वर कारवाई*
 अवैध वाळू वाहतुक करणारे हायवा टिपर क्र.MH-23.AU-1764 हे मिनी बायपास येथुन बीडकडे जात असताना  आढळून आल्याने   चालक चंद्रहार रावसाहेब जामकर, वय 29 वर्षे हायवा टिप्पर अंदाजे सहा ब्रास वाळू जप्त करून कारवाई साठी बीड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक,  हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाड़े
बीड ,पोलोस निरोक्षक स्थागृशा बीड  भारत राऊत, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे ,पोलीस कर्मचारी  गर्जे, पवार , काळे आणि  चालक गर्जे यांनी केली  आहे.

Share this story