*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला!*
*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला!*

 

 

बीड दि २० ऑक्टोबर,प्रतिनिधी

बीड मधील  कोरोना CORONA बाधितांचा आकडा कमी होताना दिसत  आहे. कालच्या पेक्षा हा आकडा कमी झाला आहे.आष्टी तालुक्यात ही संख्या वाढली असून २१  बाधित आढळून आले आहेत. तर बीडची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. आज दुपारी आलेल्या अहवालात ८५    कोरोना बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील ८४८   रुग्णांचा कोरोना CORONA अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये ८५  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ७६०  रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी ०७ ब्रम्ह्गाव ०२,शेरी खुर्द ०१ ,दादेगाव ०१,डोंगरगण ०१,कडा ०२,मांडवा ०१,वाळूंज ०३ आनंदवाडी ०१,हनुमंतगाव ०१ हिवरा ०१ असे एकूण २१ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

अंबाजोगाई  ०५  , आष्टी २१  बीड २६  ,धारूर ०२ गेवराई ०२  केज ०४  ,माजलगाव ०८ परळी ०३ पाटोदा ०४   शिरूर कासार १०  वडवणी ००  असे एकूण ८५  रुग्ण कोरोना CORONA बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड  तालुक्याचा २६ इतका आहे.ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

हेही वाचा:उसतोडणी कामगारांची वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न;अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बीड मध्ये  कोरोना जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बीड शहरासह तालुक्यातील संख्या मात्र कायम आहे. सुरुवातीपासून वाढलेला परळी, अंबाजोगाई येथील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे.

Share this story