*कोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त*पालकमंत्री सुभाष देसाई*
*कोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त*पालकमंत्री सुभाष देसाई*

 

महेश डागा
औरंगाबाद दि 30 मे,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कोविड-19 संशोधन केंद्र (Covid-19 Testing & Research Facility Center) ला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोविड-19 या विषाणुच्या प्रसाराला अटकाव करण्याकरिता यावर संशोधन होणे गरजेचे असल्याने या संशोधन कार्यात हे ‘कोविड-19 संशोधन केंद्र’ नक्कीच मोलाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. सात जूनपर्यंत प्रयोगशाळा पूर्णत: कार्यरत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोविड-19 विषाणुच्या संशोधनाकरिता हे केंद्र राज्यातील तिसरे केंद्र असून या संशोधन केंद्रांत सध्या 23 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असून येथे दररोज 1 हजार पर्यंत स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.

हे ही वाचा:अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ ब्रॉड गेज नवीन लाईनवर मेहकरी पुलाचे गर्डर लाँचिंग

*कोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त*पालकमंत्री सुभाष देसाई*
औरंगाबादेत सध्या मेल्ट्रॉनच्या इमारतीमध्ये 250 खाटांचे कोविड रूग्णालय एमआयडीसीमार्फत उभारण्यात येत आहे. सर्व सुविधांयुक्त असलेले रुग्णालय मनपाकडे 10 जूनपर्यंत सोपविण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संबंधित रुग्णालय विशेष संसर्गजन्य रुग्णालय करण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद शहरातील, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे, हा सर्व परिणाम जनतेने दिलेल्या सहकार्यातून शक्य झाला आहे. औरंगाबादेत 8 मे रोजी 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. परंतु दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये घट होते आहे. ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा नागरिकांना त्रास झाला. परंतु नागरिकांच्या हितासाठीच शासनाने निर्णय घेतला. जनतेनेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात आता उद्योगांना परवानगी दिली आहे. प्रवासालाही परवानगी दिलेली आहे. शहरात बंधने होती, प्रसंगी प्रशासनाने कटुता स्वीकारत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे आता संसर्ग कमी होताना दिसत आहे. कालांतराने तो पूर्णत: कमी होईल आणि आपण कोरोनातून मुक्त होऊ, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात दोन हजार खाटांची सुसज्जता करण्यात येते आहे. खबरदारी म्हणून प्रशासन सज्ज आहे. घाटी, मिनी घाटीतील औषध साठा, मनुष्यबळाचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी आतापर्यंत घेतलेली खबरदारी यापुढेही घ्यावी. मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, सॅनिटायजरचा वापर करावा अथवा वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील इतर प्रश्नांचाही आढावा घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये टोळधाडीसाठी करावयाचे नियंत्रण, बांधावर बियाणे, खते वाटप, भाजीपाला खरेदी, टँकर मागणीचे तालुकास्तरावर निर्णय, कापूस खरेदी केंद्रे, तूर, हरभरा, मका खरेदी, जिल्ह्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देणे याबाबतही आढावा घेतल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

Share this story