माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून गहिनाथगडाच्याही पादुका जाणार हेलिकॉप्टरने पंढरपूरला.
माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून गहिनाथगडाच्याही पादुका जाणार हेलिकॉप्टरने पंढरपूरला.

 

आष्टी दि 5 जून /टीम सीएम न्यूज

श्री संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापूर्वी सुरू केलेला श्री क्षेत्र गहिनाथगड ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी पालखी सोहळा सुरू आहे. परंतु यावर्षी कोरोना महामारी या संकटामुळे शासनाने पंढरपूर येथील आषाढी यात्रा सोहळा रद्द केल्यामुळे श्री क्षेत्र गहिनाथगड ते पंढरपूर पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांनी पुढाकार घेऊन गहिनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांना आपण पालखी सोहळ्याला खंड होऊ नये म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या धर्तीवर आपणही पादुका हेलिकॉप्टरने घेऊन जाणार आहोत असा निर्णय घेतला आहे. दि.३० जून रोजी दुपारी पादुका प्रस्थान सोहळा होणार आहे अशी माहिती माजी आ.भीमराव धोंडे व गहिनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.धोंडे म्हणाले की, आपण या पायी दिंडी सोहळ्याचे लाखो भाविकांना पंढरपूर जवळ पखालपूर याठिकाणी जेवण देतो परंतु यावर्षी जेवण देण्याचा प्रश्नच नसल्याने आपणाला संत वामनभाऊंनी गहिनाथगडाच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्याची सद्बुद्धी दिली असल्याचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी महंत विठ्ठल महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायाचे मूळ अधिष्ठान गहिनाथगड आहे. पंढरपूर दिंडीची मोठी परंपरा आहे.ही महाराष्ट्रातील मोठी दिंडी आहे. यावर्षी खंड पडत असे वाटत असताना माजी आ. भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथगडावरील पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगितले.

Share this story